Breaking News

बिस्किटच्या बॉक्समधून गांजाची वाहतूक; 26 किलो गांजा जप्त

नेरळ पोलिसांनी कारचा पाठलाग करून एकाला पकडले

कर्जत ः बातमीदार

बिस्किटच्या बॉक्समधून गांजाची वाहतूक करणारी एक कार नेरळ पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना घडली. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन सूत्रधार पळून गेला, मात्र कारचालक पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 26 किलो गांजा जप्तकेला आहे.अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर नेरळ पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जात होती. कल्याण फाटा येथे शनिवारी पहाटे चारच्या एक इर्टिगा कारला (एमएच 05 इएल 0464) पोलिसांनी शिटी वाजवून थांबविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती गाडी सुसाट वेगाने कर्जतकडे निघून गेली. पोलिसांनी पाठलाग करून ती अडविली असता या कारमध्ये विक्रीसाठी चालविलेला तब्बल 26 किलो गांजा आढळून आला. याची किंमत सुमारे सव्वा लाख आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून मुख्य सूत्रधाराचे मोबाइल पोलिसांच्या हाती लागल्याने त्याच्यापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply