Breaking News

शासकीय मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील शासकीय मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि. 3) श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या विद्यालयाला आधुनिक साहित्य पुरविण्यासोबत विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळण्यासाठी  संगणक भेट देण्यात येतील, अशी ग्वाही डॉ. किरण पाटील यांनी या वेळी दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सोमवारी सकाळी शासकीय मूकबधिर विद्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शिक्षणकांसोबत संवाद साधत विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आणखी काय प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून समोर आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी विद्यार्थी व शिक्षकांना दिले व विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप केले. डॉ. किरण पाटील यांनी या वेळी शासकीय मूकबधिर विद्यालयातील वर्गखोल्या, निवासव्यवस्था, स्वयंपाकघर यांची पाहणी केली. विद्यालयाचे प्रभारी अधीक्षक किशोर वेखंडे, विशेष शिक्षक सतीश शिंदे, अनंद बोरकर, काळजीवाहक भीमा हिंदोळा, पहारेकरी वाळकु पारधी या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply