Breaking News

राजे शिवराय प्रतिष्ठानचा दुर्गदर्शन सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या दुर्गदर्शन सोहळ्याचे उद्घाटन रविवारी (दि. 23) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंघचालक प्रशांत कोळी, राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे उपस्थित होते. जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने राजे शिवराय प्रतिष्ठान मागील 16 वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. प्रतिष्ठानचे पनवेल विभागाचे संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला अभ्यास मोहिमेपासून ते उभारणीपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रेम, ओंकार, चैतन्य, पार्थ, श्रेयस, मंदार, अजय, प्रसाद, पायल, सूरज, संग्राम, शुभम, कल्पेश यांनी सतत 10 दिवस पावसाचे आव्हान स्वीकारत काम करून किल्ला प्रतिकृती पूर्ण केली. दगड, माती, विटा वापरून हा किल्ला बनविण्यात आला आहे. यादरम्यान टीमवर्क, कम्युनिकेशन स्किल, प्लॅनिंग या पद्धतीचे व्यक्तिमत्व विकासाचे धडे मुलांना मिळाले. या वेळी कार्यक्रम प्रमुख धनेश नीचीत हे होते. सूत्रसंचालन संकेत भोसले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार केतन गुरव यांनी मानले. किल्याची प्रतिकृती 30 ऑक्टोबरपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली राहणार असून शेवटच्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव साजरा करून सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply