माणगावमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पळसगाव, निजामपूर भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 29) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
माणगाव तालुक्यातील होडगाव कोंड ते गांगवली रायगड-पाचाड जोड रस्ता (85 लाख 50 हजार रुपये), होडगाव कोंड ते तोंडलेकरवाडी रस्त्यावरील पूल (दोन कोटी 60 लाख रुपये), तोंडलेकरवाडी ते साळवे रस्ता डांबरीकरण (23लाख 75 हजार रुपये), कुंभारवाडी ते समर्थ बैठक हॉल ते ताम्हाणे रस्ता डांबरीकरण (20 लाख रुपये), गांगवली नळ पाणीपुरवठा योजना (96 लाख 40 हजार 412 रुपये) या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव साबळे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, माजी विभाग प्रमुख गणेश समेळ, विभाग प्रमुख मनोज सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख अच्चुत तोंडलेकर, उपविभाग प्रमुख समीर तेटगुरे, महाड विधानसभा मतदार संघ युवासेना प्रमुख वैभव मोरे, उपतालुका प्रमुख नितीन पवार
यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
Check Also
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक
शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …