खारेपाट : वार्ताहर
रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनतर्फे कोएसो हायस्कूल माणकुले येथील पटांगणात जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेत जय मल्हार स्पोर्ट्स मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत मुरूड, पेण, पाली, अलिबाग, खालापूर, पनवेल तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक मॉडेल संघ रांजणखार, तृतीय बोर्ली मांडला संघ, तर चतुर्थ क्रमांक सुपर किंग पनवेल संघाने पटकाविला. या स्पर्धेमधून निवडलेला संघ 3 व 4 डिसेंबर रोजी पारनेर (जि. अहमदनगर) येथे होणार्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Check Also
‘जनसेवेचे अमृतपर्व’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन
मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper