पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत सुयश प्राप्त केले आहे.
मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटात डॉजबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. 14 वर्षाखालील जुडो स्पर्धेत विद्यालयाच्या आदिती माने व तन्मय दळवी यांनी प्रथम, तर वेदांत झंजाड व रौनक सिंग यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच 17 वर्षाखालील गटात जान्हवी पवार हिने प्रथम क्रमांक व निधी टिकेने तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय पियुष मरगळेने प्रथम तसेच आश्लेष चिमणे, पार्थ पाटील व नयन चौगुले यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास याचबरोबर खेळालाही प्राधान्य देणार्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रतिज्ञा पाटील, रूपाली जोगदंड आणि हितेश कडू यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper