पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेमध्ये 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगड जिल्ह्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी, एसएमडीएल कॉलेज कळंबोली आणि कारमेल कान्वेंट स्कूल कळंबोलीमधील भूपेंद्र मार्शल ट्रेनिंग प्रोव्हाइडर संस्थेचे संस्थापक आणि प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड यांच्या 46 खेळाडूंनी सहभाग घेतला.
रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 13 कांस्यपदके जिंकून पहिल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्याचप्रमाणे प्रशिक्षक गायकवाड यांना बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper