Breaking News

रातोरात तब्ब्ल 13 गाड्यांचे पार्ट चोरीस

तळोजा परिसरात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर
तळोजा परिसरात गाड्यांचे प्रमाण वाढले आहेत. तळोजा परिसरात एक अज्ञात चोराने एकाच रात्री तब्ब्ल 13 व्हॅगनार गाड्यांमधील इंजिन पार्ट चोरून नेले आहेत. या पार्टची प्रत्येकी किंमत 5000 प्रमाणे 70000 रुपयांचे पार्ट चोरले लंपास केले आहेत.
इरफान मैफूज शेख (वय 43 वर्षे, तळोजा फेज 01) यांची मारूती व्हॅगनार गाडी नं एमएच 03 बीसी 2363 व गाडी न एमएच 05 बीजे 0865 ह्या गाड्या मन्नत अपार्टमेंन्ट, तळोजा फेज-02 या बिल्डींगच्या समोरील सार्वजनीक रस्त्यालगत पार्क करून ठेवल्या होत्या. या गाड्यांमधील तसेच तळोजा फेज – 01 व फेज – 02 परीसरामध्ये असलेल्या 13 मारुती व्हॅगनार गाड्यांमधील इसीएस (इंजिन कंट्रोल मॉडयूल) हे अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहेत. या पार्टची सुमारे 70000 हजार रुपये असून या चोराविरोधात भा. दं. वि. कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, तळोजा परिसरासह पनवेल तालुक्यात उभ्या चारचाकी गाड्यांचे पार्ट चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा चोरांवर कडक कारवार्ई करून सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply