पनवेल : वार्ताहर
उलवेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बस स्टॉप वर बसची वाट पाहणार्या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उलवे येथून सीवुड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणार्या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणाने छातीला हाताने स्पर्श करून तिचा विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात तरुणावर न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी आरोपी हा 20 ते 25 वर्ष वयोगटाचा असून रंगाने सावळा, उंची पाच फुट पाच इंच, अंगाने सडपातळ, केस वाढलेले, कपाळ मोठे, अंगात लाल रंगाचा गोल गळ्याचा फुल टी शर्ट, हिरव्या रंगाची फुल पॅन्ट तसेच पायात चप्पल घातलेली आहे.
या आरोपीची माहिती मिळण्यासाठी पोलिसांकडून त्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे व या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक महावीर जाधव (9822461631) तसेच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार (9890689894) येथे संपर्क साधावा.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper