अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यात जमीन विकत घ्यायची आहे, असे सांगून ओळख वाढवून एका महिलेने तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर त्याच्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेस तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून आणखी काही तरुणांकडून पैसे घेतले असल्याचे बोलले जात आहे.
सुरुवातील फोनवरून बोलून ओळख काढत या महिलेने फिर्यादीला आवास येथील एका कॉटेजमध्ये नेले. तेथे त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले. या प्रसांगाची व्हिडीओ क्लिप तयार केली. त्यानंतर या व्हिडीओ क्लिपच्या आधारे आरोपी महिलेने या तरुणाला धमकावण्यास सुरुवात केली व पाच लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाहीस तर व्हिडिओ तुमच्या गावातील लोकांना तसेच फिर्यादी यांची पत्नी व भावाला पाठवुन वायरल करेन, अशी धमकीही महिलेने दिली होती. याबाबत फिर्यादीने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीने फिर्यादीला खंडणीची रक्कम घेऊन 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत येथे येण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चर्चगेट येथून आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper