पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 19च्या वतीने रविवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रेनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 15 वर्षांखालील मुलामुलींसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ (8767149203) किंवा रोहित जगताप (8691930709) यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper