नागोठणे : प्रतिनिधी
बाळासाहेब् ठाकरे यांच्या विचारावर चालणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेनेच नाव आणी धनुष्यबाण चिन्ह मिळताच बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी नागोठणे येथील शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला.
बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणी ते विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत आणी निवडणूक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केला असल्यामुळे शनिवारी नागोठणे येथे आनंद उत्सव फटाक्यांची अतषबाजी करत घोषणा देऊन साजरा केला.
या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना पक्षाचे नागोठणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, नागोठणे उपविभाग प्रमुख आकाश मढवी, नागोठणे उपविभाग प्रमुख प्रशांत कामथे, शहर प्रमुख आमित खामकर, संपर्क प्रमुख विठ्ठल कदम, निडी शाखा प्रमुख संतोष मढवी, शेतपलस सदस्य यतिश डाकी, कार्यकर्ते निवृत्ती जंगले, किसन मढवी आणी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
Check Also
अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …
RamPrahar – The Panvel Daily Paper