Breaking News

ड्यू ड्रॉप्स स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले चिमुकल्यांचे कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वतःच्या मुलांप्रमाणे ड्यू ड्रॉप्समध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्नेहसंमेलनावेळी काढले.
पनवेल शहरातील ड्यू ड्रॉप्स स्कूलचा 20वा रीदम 2022-23हे वार्षिक स्नेहसंलमेन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (दि. 22) आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या समारंभाला माजी खासदार लोकेनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी मार्गदर्शनकेले आणि स्कूलसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी ज्येष्ठनेते वाय. टी. देशमुख, डायरेक्टर रामा मानेक, सेक्रेटरी नितीन मानेक, प्रिन्सीपल हिना मानेक यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply