पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यात शिंदे गटातील प्रमुखांच्या पदांची नियुक्ती करण्यात आली होती, तर तालुक्यात पक्ष वाढवून तरुणांची फळी उभी करण्यासाठी जिल्ह्यातील तीनही आमदार प्रयत्नशील असून शिवसेनेत इनकमिंग सुरु झाल्याचे पक्ष प्रवेशावरून दिसून येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण येथील तरुण तडफदार व्यक्तिमत्त्व असलेले दिनेश पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यांच्यावर पेण शहर प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार दळवी व जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत दिनेश पाटील यांची पेण शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली असून या वेळी पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, विधानसभा संघटक राहूल पाटील आदींसह अलिबाग व पेण येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना शहरप्रमुख दिनेश पाटील यांनी सांगितले की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्व व कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवून पेण नगरपालिकेत शिवसेनेचे शिलेदार पाठवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper