Breaking News

उलवे नोड येथील रामबागमध्ये संगीतसंध्या रंगली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
आबालवृद्धांचे आकर्षण बनलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी (उलवे नोड) येथील रामबागमध्ये रविवारी (दि. 26) संगीतमय कार्यक्रम रंगला. त्यास श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला. या वेळी रामबागचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
रामबागमध्ये नागरिकांचा वाढता ओघ लक्षात घेता रविवारी संगीत मैफल होत असते. त्यानुसार पी. सी. म्हात्रे आणि पुरुषोत्तम म्हात्रे प्रस्तुत ये श्याम मस्तानी हा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. यामध्ये गायक रवी नाईक, पी. सी. म्हात्रे व टीमने गीते गायली.
या कार्यक्रमास न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, सदस्य सागर ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणशेठ ठाकूर, सी. एल. ठाकूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply