पनवेल : वार्ताहर
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तीन वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी उघड झाली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पीडित मुलगी आपल्या आईसोबत पनवेल रेल्वेस्थानकात झोपली होती. आई झोपली असल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने मुलीला उचलून नेले आणि रेल्वेस्थानकाच्या शेजारी असलेल्या झाडाझुडपात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला. सकाळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना होऊन आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper