Breaking News

शिवराज्याभिषेक दिनाच्या तयारीची शासकीय बैठक ; 6 जून रोजी किल्ले रायगडावर सोहळा

महाड : प्रतिनिधी

6 जून रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, याकरिता शिवप्रेमी आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता केल्या जाणार्‍या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाड प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे 6 जून रोजी छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने गेली अनेक वर्ष शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. या सोहळ्याला लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर येत असतात. याबाबत केल्या जाणार्‍या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाडचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, महाड पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील, तहसीलदार चंद्रसेन पवार, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, आदी मान्यवर उपस्थित होते. रायगडावर असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या आणि वाहन पार्किंगचा प्रश्न याबाबत या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यापूर्वी येथे येणार्‍या शिवभक्तांना होणार्‍या विविध समस्यांचीही या वेळी चर्चा करण्यात आली, तसेच पार्किंग समस्या कशाप्रकारे सोडविता येईल याचीही सविस्तर चार्चा करण्यात आली. यावर विविध तोडगे सुचविण्यात आले व त्याच्या अमलबाजावणीबाबत चर्चा झाली.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply