Breaking News

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई करीत राहुल यांना खासदार म्हणून अपात्र ठरविले आहे.
राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील कोलार येथे आयोजित सभेत बोलताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे, असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. या प्रकरणी गुरुवारी सुरत न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे, पण शिक्षेला स्थगिती दिलेली नसून वरच्या कोर्टात अपील करता यावे यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला आहे, मात्र राहुल यांना शिक्षा झाल्याने त्यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यांच्यासह काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply