Breaking News

खोरा बंदरातील नवीन जेट्टीच्या बांधकामासाठी ‘सॉईल टेस्टिंग’

लवकरच कामाला सुरुवात होणार

मुरुड : प्रतिनिधी

खोरा बंदरात नवीन जेट्टी बनवण्यासाठी सॉईल टेस्टिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सॉईल टेस्टिंगद्वारे खोलगट भागात खडकाचे, दगडाचे व मातीचे प्रमाण काय आहे हे कळणार असून त्याद्वारे नवीन जेट्टीचे काम करणे सुलभ होणार आहे. 30 मीटर अंतरावर सॉईल टेस्टिंग करण्यात येणार आहे. असे पाच टप्पे करण्यात येणार असून त्याचा अहवाल प्रयोग शाळेत तपासून तो अहवाल सादर केला जाणार आहे. सॉईल टेस्टिंगच्या कामास किमान एक महिना जाणार आहे. तदनंतर अहवाल प्राप्त झाल्यावर नवीन जेट्टी चे बांधकाम प्रत्यक्षात ओक्टोम्बर 2023 रोजी सुरु होणार आहे.त्यामुळे टेंडर होऊन सुद्धा किमान एक वर्ष अंतराने प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होताना दिसत आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना किल्ल्यापर्यंत पोहचवले जाते. या दोन्ही बंदरात तुफान गर्दी सुट्टीच्या हंगामात होत असते. त्यामुळे नवीन जेट्टीची सुरुवात झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply