पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवसेना-भाजप युतीतर्फे पनवेल विभागात काढण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2 एप्रिलऐवजी आता 9 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ही गौरव यात्रा 2 एप्रिलला होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली होती, पण यात्रेची अधिक चांगली तयारी करता यावी याकरिता 2 एप्रिलऐवजी 9 एप्रिलला ही यात्रा पनवेलमध्ये होणार आहे. तारखेत झालेला बदलाचा निर्णय भाजप व शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी एकत्रितपणे घेतला आहे. त्यामुळे सर्व पदाधिकार्यांनी आयोजनाबाबतच्या बैठका सुरू ठेवून अधिकाधिक चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper