Breaking News

एमजीपीएलचा केएम ग्रुप विजेता

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील मानिवली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग (एमजीपीएल)चे आयोजन करण्यात आले होते. यात केएम ग्रुप संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मानिवली परिसरातील भव्य पटांगणात रंगलेल्या एमजीपीएलमध्ये 16 संघ सहभागी झाले होते. या वेळी चुरशीचे सामने होऊन वरई लिओन्स इलेव्हन संघ उपविजेता ठरला. या वेळी माजी सरपंच प्रवीण डायरे, माजी उपसरपंच प्रीतम डायरे, रूपेश गवळी, अक्षय गवळी आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply