Breaking News

खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आपला दवाखानाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर 12 येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित झाला आहे. या योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले, तर खारघरमध्ये आपला दवाखानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या दवाखान्याच्या शुभारंभावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, माजी नगरसेवक अनिल भगत, निलेश बावीस्कर, प्रवीण पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

राज्य कबड्डी स्पर्धेत रायगडच्या संघांनी नाव उज्ज्वल करावे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तसिन्नर (नाशिक) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पुरुष व …

Leave a Reply