सीबीएसई बारावी आणि दहावीच्या परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 12) जाहीर केला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने यंदाही धवल यश प्राप्त केले आहे. दहावी आणि बारावी अशा दोन्ही इयत्तांमध्ये विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच प्राचार्य व शिक्षकवृंदाचे अभिनंदन व कौतुक केले.
इयत्ता बारावीत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सर्वच्या सर्व म्हणजे 179 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 139 आणि वाणिज्य शाखेच्या 40 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यालयातून भाग्यश्री शरद सुरासे (97.20%) प्रथम, आदिनाथ आपटे (95.80%) द्वितीय आणि पृथ्वी प्रवीण पाटील (95.60%) तृतीय आला. विशेष म्हणजे भाग्यश्रीने कोणताही क्लास न लावता हे यश मिळविले असून ती दहावीतही टॉपर होती.
विद्यालयातील 35 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक, 91 विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांहून अधिक, 123 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक आणि 172 विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. विद्यालयातील जाहन्वी शर्मा हिने मॅथेमॅटिक्स या विषयात, तर पृथ्वी प्रवीण पाटील व उन्नती श्रेष्ठ सिंहने फिजिकल एज्युकेशन विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.
इयत्ता दहावीतही विद्यालयातील सर्वच्या सर्व 252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून पार्थ बुटे (98.40%) प्रथम, तर्जनी पास्तागिया (98.20%) द्वितीय आणि तुषार चिंचणीकर व पार्थ क्षीरसागर (98%) संयुक्तपणे तिसरे आले.
विद्यालयातील 81 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक, 166 विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांहून अधिक, 194 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक आणि 238 विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
विद्यालयातील 35 विद्यार्थ्यांनी आर्टिफिशल इंटेलिजेंस या विषयात, चार विद्यार्थ्यांनी मॅथेमेटिक्स विषयात, तीन विद्यार्थ्यांना मराठी विषयात, दोन विद्यार्थ्यांनी सोशल सायन्स, तर दोन विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयात 100 गुण मिळविले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य राज अलोनी, अमोघ ठाकूर आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply