Breaking News

कुडाळच्या ‘ढिंग टँग ढिटँग’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक

गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या ढ मंडळी टीमची ’ढिंग टँग ढिटँग’ ही एकांकिका विजेती ठरली. त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरविण्यात आले.
पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण रविवारी (दि.10) झाले. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास स्पर्धेचा बँ्रड अँबेसिडर प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे, परीक्षक अभिनेते लेखक व दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक व दिग्दर्शक राजन ताम्हाणे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, उद्योजक विलास कोठारी, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सिने व नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सहकार्यवाह स्मिता गांधी, कोषाध्यक्ष अमोल खेर, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, समन्वयक गणेश जगताप, चिन्मय समेळ, ओंकार सोष्टे केदार भगत, प्रीतम म्हात्रे, किरण पाटील, अभिषेक भोपी, अक्षय सिंग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहराध्यक्ष वैभव बुवा यांनी केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने बहुमानाचा अटल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. परीक्षकांचा निकाल येई पर्यंत अनेकांच्या मनात धाकधूक होती. अखेर रात्री 9.45 वाजता रंगमंचावर अटल करंडक आला आणि नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्या एकांकिकेचे नाव जाहीर करताच कुडाळच्या ढ मंडळी टीमने एकच जल्लोष करीत रंगमंचावर धाव घेतली.
या वेळी प्रास्ताविक करताना परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यश हे कलारसिक आणि स्पर्धक यांच्यामुळे असून राज्यातील सांस्कृतिक चळवळीत पनवेलचेही योगदान असावे यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.
सविस्तर निकाल
एकांकिका प्रथम क्रमांक ः ढिंग टँग ढिटँग (ढ मंडळी कुडाळ) एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक
द्वितीय क्रमांक ः खुदिराम (स्वर्ण पटकथा, क्राऊड) 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ः टोपरं (नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज, अंधेरी) 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ः उणिवांची गोष्ट (ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे) 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ ः अम्मा (निर्मिती, वसई) आणि नारायणास्त्र (नटवर्य रंगमंच, विरार) प्रत्येकी पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
परीक्षक पसंती एकांकिका ः लोकल पार्लर (खालसा महाविद्यालय, मुंबई) सात हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
लक्षवेधी एकांकिका ः काक्षी (सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल) सात हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ः प्रथम क्रमांक ढिंग टँग ढिटँग (ढ मंडळी कुडाळ) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय टोपरं (नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज, अंधेरी) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय आषुतोष जरे (खुदिराम, स्वर्ण पटकथा, क्राऊड) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ युगीन (नारायणास्त्र, नटवर्य रंगमंच, विरार) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनेता ः प्रथम क्रमांक परिन मोरे, (काक्षी, सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय श्रेयस जोशी (सिनेमा, मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय शुभम जाधव (नारायणास्त्र, नटवर्य रंगमंच, विरार) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ नितीन कापरेकर (जिन्याखालची खोली, कलांश थिएटर, मुंबई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ः प्रथम क्रमांक जयलक्ष्मी (अम्मा, निर्मिती, वसई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय सानिका पाटीलल (काशी, सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय संचिता जोशी (चाहुल, कलाकार मंडळी, पुणे) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ हिर रभाडिया (अलॉव मी, केईएस कॉलेज, मुंबई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट लेखक ः प्रथम क्रमांक गायत्री नाईक (टोपरं, नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज, अंधेरी) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय विठ्ठल सावंत (काव काव, वसा नाट्यपरंपरेचा) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय नितीन-अजय (उणिवांची गोष्ट, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ रोहन कोतेकर (अम्मा, निर्मिती, वसई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट नेपथ्य ः प्रथम क्रमांक रोहित (काक्षी, सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय राहुल-रोहन (सिनेमा, मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय भारत शिरसाट (नारायणास्त्र, नटवर्य रंगमंच, विरार) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ सागर (खुदिराम, स्वर्ण पटकथा, क्राऊड) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना ः शाम चव्हाण (पुंडलिका भेटी, एम.डी. कॉलेज, मुंबई, दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय निलेश कदम (सुमित्रा, रंगसंगती, मुंबई) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय अभिप्राय कामठे (सिनेमा, मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ राजेश शिंदे (खुदिराम, स्वर्ण पटकथा, क्राऊड) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट संगीत ः पुंडलिका भेटी (एम.डी. कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; द्वितीय ढिंग टँग ढिटँग (ढ मंडळी कुडाळ) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय टोपरं (नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज, अंधेरी) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ काक्षी (सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्कृष्ट वेशभूषा (कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ) ः तृप्ती झुंजारराव (काक्षी, सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्कृष्ट विनोदी कलाकार ः तेजस मस्के (ढिंग टँग ढिटँग, ढ मंडळी कुडाळ) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्कृष्ट बालकलाकार ः आरोही रानडे (क्विन ऑफ द नाईट, त्रिकुटालय थिएटर, पनवेल) आणि आरव आहिर (ढिंग टँग ढिटँग, ढ मंडळी, कुडाळ) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply