पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणुकप्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कोळखे पेठ, ढोंगर्‍याचा पाड्यात प्रचार पत्रकांचे वाटप करून श्रीरंग बारणे यांना मत देऊन त्यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचे आवाहन मतदारांना केले. या कोळखे पेठ येथे प्रचारावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष व शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, ग्रामपंचायत सदस्य विलास भोईर, ढोंगर्‍याचा पाडा येथे रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, प्रभाग 2 अध्यक्ष कृष्णा पाटील, महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, अशोकशेठ साळुंखे, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, लहूशेठ डोंगरे, श्रीनाथ पाटील, मेघनाथ पाटील, ज्ञानेश्वर डोंगरे, हरिशेठ फडके, नवनाथ डोंगरे, जाणू डोंगरे, रोशन डोंगरे, महेंद्र डोंगरे, रोशन पाटील, अ‍ॅड. पवन भोईर, आशिष कडू यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply