Breaking News

शेकाप वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसमोर शेकापने शरणागती पत्करली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेकापला अखेरचा सलाम करत देशविकासाची विचारधारा असलेल्या भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्याच अनुषंगाने शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी असंख्य समर्थकांसह रविवारी (दि. 28) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शनिवारीच रोडपाली येथील प्रवेशाच्या धक्क्यातून सावरत नसताना आणखी एक मोठा धक्का शेकापला बसला आहे.
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते जयेंद्र शेळके व सहकार्‍यांना भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, प्रभाकर जोशी, प्रल्हाद गायकर, सचिन वास्कर आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
या वेळी शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांच्यासोबत ओवे, रांजणपाडा, ओवेकॅम्प, सेक्टर 27, 34, 35, भागेश्री सोसायटी, रोहींजण येथील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये जगदीश शेळके, लहू शेळके, महेंद्र शेळके, अशोक शेळके, कैलास शेळके, भावेश शेळके, कुणाल शेळके, सुभाष शेळके, सुनिल शेळके, हर्ष शेळके, समीर वाघमारे, शादाब शेख, तन्वीर शेख, आफताब शेख, सुफियान शेख, कैलास वास्कर, प्रभाकर वास्कर, महेश वास्कर, संतोष घरत, प्रशांत जोशी, शंकूनाथ गडगे, केतन म्हात्रे, पंढरीनाथ भाग्यवंत, चंदू भोपी, राजन चौधरी, खुटाराम चौधरी, प्रेमाराम चौधरी, बगदराम चौधरी, प्रकाश चौधरी, उमेशराम चौधरी, नेनाराम चौधरी, योगेश भीमराव जाधव, रोहित चव्हाण, दीपक भातोसे, सुशांत साळुंखे, गणेश जाधव, धनंजय साळुंखे, शिवराम जाधव, निलेश जाधव, मुकेश चौधरी, वरूण कांबळे, गौतम कांबळे, लखनभाई, छोटूभाई, कमलाकर पाटील, कुंदन घरत, सिद्धार्थ केणी, जतिन केणी, पियुष खुटारकर, कुणाल खुटारकर व समर्थकांनी ‘कमळ’ हाती घेतले.
शेकाप ध्येय-धोरणे विसरून इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन चालत आहे. एकेकाळी शानमध्ये असलेल्या शेकापला लागलेली घरघर आता वाढली आहे. त्यामुळे शेकापने महाविकास आघाडीसमोर एक प्रकारे नांगी टाकली असल्याने शेकाप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व नाराजीचा सूर उमटत आहे. शेकापची अवस्था बिकट झाली असून इतर पक्षांच्या छायेत जगण्याची सवय झाली आहे आणि हीच गोष्ट कार्यकर्त्यांच्या संतापाचे कारण ठरत आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply