पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील अजिवली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 26 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्या रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) झाले.
पनवेल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची कामे सुरू असून नागरिकांना सुविधा देण्यासाठी त्यांचे नेहमीच प्राधान्य असते. त्यानुसार त्यांच्या 16 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून अजिवली येथे तबेला ते बौद्धवाडा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून रा.जि.प. शाळा ते हसुराम माळी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते हे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, योगेश लहाने, ज्ञानेश्वर भागित, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अप्पा भागित, माजी सदस्य एम.जे. माळी, संतोष पाटील, राजेश काठावले, कल्पेश गोजे, प्रसाद पाटील, प्रमिला पाटील, काशिनाथ जाधव, जतीन भागित, सिद्धेश भागित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी
असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …
RamPrahar – The Panvel Daily Paper