अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विचुंबे येथे उपक्रमाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना 5 ते 20 मार्चपर्यंत स्मार्ट एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. विचुंबे येथे सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.5) झाले.
या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भुपेंद्र पाटील, चिटणीस यतीन पाटील, माजी जि. प.सदस्य अमित जाधव, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, माजी सरपंच बळीराम पाटील, श्याम पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच संदीप वाघमारे, सदस्य के.डी.वाघमारे, आप्पा गायकवाड, चेतन सुरते, अभय गोंधळी आदी उपस्थित होते.
विचुंबे ग्रामपंचायती समोर हा उपक्रम सुरू झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपकरण जीवनाचा भाग झाला आहे. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, कलर टीव्ही, एलसीडी त्यानंतर अधिक स्पष्टतेसाठी एलईडी असे तंत्रज्ञान बदल घडत गेले. त्याचप्रमाणे शरीर आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलचा वापर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर या वस्तू नागरिकांना कमी दरात मिळाव्यात यासाठी 50 टक्के सवलत ही योजना राबवली आहे. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper