पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय पर्यावरण कायदा वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 23) झाला.
या स्पर्धेत देशभरातील अनेक संघांनी सहभाग घेतला आणि पर्यावरण कायद्याच्या क्षेत्रातील आपली कौशल्ये प्रदर्शित केली. स्पर्धेत विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांवर सखोल चर्चा करण्याची आणि त्यांचे कायदेशीर कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. स्पर्धेचा सेमी फायनल आणि फायनल राऊंड रविवारी झाला. अॅड. उदय वरुंजेकर, अॅड. संजीव सावंत, न्यायमूर्ती उमेश साल्वी, न्यायमूर्ती अभय थिप्से यांनी स्पर्धेचे मूल्यांकन केले.
स्पर्धेत मुंबईतील के.सी. कॉलेजचा संघ विजयी झाला असून त्यांना 25 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. पुण्यातील क्राइस्ट युनिव्हर्सिटीने द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना 15 हजार रुपये आणि सन्मानचिन देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट मेमोरियल नागपूरमधील एमएलयु कॉलेज, सर्वोत्कृष्ट मुटर्स म्हणून के.सी. कॉलेजची रोजिना कोंटिन्हो, तर सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या अनन्या जॉय यांना प्रत्येकी 10 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव एस.टी. गडदे, प्राचार्य सानवी देशमुख, समन्वयक धनश्री कदम, न्यायमूर्ती उमेश साल्वी, न्यायमूर्ती अभय थिप्से यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये ८ ऑगस्टला महारोजगार मेळावा
दहावीपासून पदव्युत्तर, कुशल उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल ः रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper