हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणी यांनी दिला खांदा

अमेठी ः वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती. बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनीही येथे उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. या वेळी स्मृती इराणी यांना अश्रू अनावर झाले होते.

शनिवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना उपचारासाठी लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply