रांची : वृत्तसंस्था
बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 60 लाखांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. लालूंविरोधातील हा पाचवा चारा घोटाळा आहे.
डोरांडा कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालूंना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने लालूंसह 38 आरोपींना दोषी ठरवले होते. यानंतर लालूंची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ते रिम्समधूनच कोर्टात उपस्थित होते. त्यांच्यासह इतर दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात आली.
यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे दुमका, देवघर आणि चाईबासा कोषागारातून पैसे काढण्याशी संबंधित होती. आता लालूंना डोरंडा कोषागार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांना भा. दं. वि. कलम 409, 420, 467, 468, 471 याशिवाय कट रचण्याशी संबंधित कलम 120 ब आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper