नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
बेलापूर येथील सिडको भवनात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची सिडकोसंदर्भातील प्रलंबित असलेल्या विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत सिडको अंतर्गत होणारा अत्यंत अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, ‘नैना’विषयक प्रलंबित समस्या, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे व बांधकामे नियमित करणे यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लागावेत, अशी मागणी केली.
दरम्यान, सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत लेखी निवेदनदेखील सिडकोकडे देण्यात आले आहे. या बैठकीला सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper