उरण ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघात भाजप दिवसेंदिवस मजबूत बनतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उरण उपशहर प्रमुख गणेश पाटील, काँग्रेस पक्षातून मोठी जुईचे माणिक कोळी तसेच शिंदेसेनेचे महालण विभागीय अध्यक्ष गणेश घरत या तिघांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (दि. 28) ‘कमळ’ हाती घेतले. उरण शहरातील राम मंदिर सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला भाजप राज्य परिषद सदस्य रवी भोईर, उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह यांच्यासह इतर पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भाषणात सांगितले की, भाजप हा विकासाभिमुख पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथावर आहे. उरण तालुक्यातील नागरिकांना हवी असलेली विकासकामे आम्ही पूर्ण करू. पुढे बोलताना त्यांनी नव्या सहकार्यांच्या सहभागामुळे पक्ष आणखी बळकट होईल, असे नमूद केले.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper