Breaking News

पनवेलमध्ये नवदुर्गांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील सोसायटी मित्र मंडळ आयोजित झंकार नवरात्रोत्सवात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या नवदुर्गांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.28) सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, सपना पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी पोलीस निरीक्षक विमल बिडवे, डॉ. सुजाता गायकवाड, अ‍ॅड. सीमा भोईर, सामाजिक कार्यकर्त्या नम्रता धवडे, तृप्ती पालकर, ममता दोशी, रेश्मा कुरूप, गौरी धात्रक, रश्मी रामगरिया या नवदुर्गांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply