Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 11) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.
या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळाच्या सदस्य वर्षा ठाकूर, राहुल घरत, स्वप्नील ठाकूर यांची उपस्थिती लाभली. शिबिरात पालकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेत 175 जणांनी रक्तदान केले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराबाबत समाधान व्यक्त केले आणि रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान करणे हे एक सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. एका रक्तदान मोहिमेमुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करून या उदात्त कार्यात आपला खारीचा वाटा उचल्याबद्दल रक्तदात्यांचे विशेष कौतुक करत आभार मानले.
शिबिरास मुख्याध्यापक संतोष चव्हाण, निलिमा शिंदे, पर्यवेक्षिका वैशाली पारधी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी हजर होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई ब्लड बँकचे सहकार्य लाभले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply