Breaking News

माणूस कितीही मोठा झाला तरी मातीची आणि संस्कृतीची जाण महत्त्वाची -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव रंगला

पनवेल : रामप्रहर वृत्त
माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीत आपण वाढलो, त्या मातीची आणि संस्कृतीची जाण असणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भव्य गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव 2025च्या उद्घाटनावेळी केले.
गव्हाण ग्रामपंचायतीसमोरील मैदानात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 28) रंगलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा भव्य सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांनी कोळी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली तसेच आपल्या समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सांस्कृतिक वारसा जपणार्‍या या महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गव्हाण कोळीवाडा होड्यांसाठी असणार्‍या एका वैशिष्ट्यपूर्ण बावटा प्रक्षेपणाचा कार्यक्रम या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. वेसावकर आणि मंडळींचा प्रसिद्ध डान्स, गव्हाण कोळीवाडा प्रस्तुत विशेष नृत्य आणि स्टेप आर्ट डान्स ग्रुपने प्रेक्षकांची मने जिंकली. सुप्रसिद्ध गायक योगेश आग्रावकर, हितेश कडू आणि हृदया जाधव यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्थानिक ब्रास बँड आणि बँजो बँडच्या सादरीकरणाने महोत्सवात रंगत आणली. सम्राट कोळी, आकाश कोळी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ गव्हाण कोळीवाडा यांनी या भव्य महोत्सवाचे आयोजन केले होते.
या महोत्सवास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पांडुरंग म्हात्रे, भाऊशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, निलेश खारकर, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, आकाश कोळी, सम्राट कोळी, निकिता खारकर, भूषण भगत, योगिता भगत, सचिन देशमुख, विनायक कोळी, प्रमोद कोळी, पियुषा कोळी, सरगम कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिश पाटील यांनी केले.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply