Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलच्या उसर्ली परिसरात विविध विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील उसर्ली परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे सोमवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामुळे उसर्ली परिसराचा कायापालट होणार आहे.
या सोहळ्यात प्रामुख्याने रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये एक कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक निधीतून उसर्ली स्टॉप ते गावदेवी मंदिर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तसेच दोन कोटी रुपयांच्या निधीतून बसेरा ते राजे शिवाजी संकुल सोसायटीपर्यंतच्या महत्त्वाच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याव्यतिरिक्त 10 लाख रुपयांच्या निधीतून उसर्ली येथील रॅम व्ह्यू ते अंकित अपार्टमेंट या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन आणि 25 लाख 69 हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून बाजारपेठ विकास, सार्वजनिक दिवाबत्ती, बागबगीचे, उद्योग आणि अभ्यास केंद्र अशा विविध सोयीसुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या सर्व कामांमुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
या कामांच्या शुभारंभावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच नितीन भगत, सदस्य मुकेश भगत, माजी सदस्य मच्छिंद्र पाटील, संजय भगत, हेमंत भगत, प्रमोद पाटील, हरेश भगत, विनायक भगत, संदीप भगत, दीपक पाटील, वसंत भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply