भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील कानपोली येथे शनिवारी (दि.१८) विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी रायगड जिल्हा परिषद, पनवेल पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासकामांचा झंझावात सुरूच राहिल, अशी ग्वाही दिली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राष्ट्रीय मार्ग ते कानपोली या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण तसेच येथील नदीवर साकव बांधण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, नगरसेवक दिनेश खानावकर, विनोद पाटील, प्रकाश खैरे, एकनाथ पाटील, कुणाल काटे, नवनाथ पाटील, परेश पाटील, राजेश पाटील, दीपक उलवेकर, भास्कर आगलावे, डॉ. संतोष आगलावे, निखिल तांडेल, दिलीप वास्कर, शैलेश माळी, राजेश गोंधळी, बाळकृष्ण पाटील, दिनेश पाटील, निवृत्ती पाटील, रमेश मते, बाबुराव पाटील, सहदेव मते, अंकुश जोशी, गोमा पाटील, संतोष पाटील, सज्जन पवार, कैलास पाटील, आंबो पाटील, मधुकर पाटील, जीवन पाटील, गणेश पाटील, संदीप पाटील, शत्रुघ्न पाटील, प्रल्हाद साळुंखे, सचिन जोशी, मिथुन पाटील, बजरंग खानावकर, सागर पाटील, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ तसेच झाशीची राणी महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या. या दोन्ही कामांमुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper