पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त २८ व २९ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
शिवाजीनगर येथील श्री बाळकृष्ण महाराज अध्यात्मिक ज्ञानमंदिर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये संगीत भजन, प्रवचन, आरती, कीर्तन तसेच पुष्पवृष्टी यांचा समावेश होता. देवसागर साधक समाज, इंचगिरी संप्रदाय (शिवाजीनगर, गव्हाण, न्हावे, न्हावे खाडी, कोपर) तसेच ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योजक भरत ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, चंद्रभागा घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, प्रकाश भगत, संजय भगत, अरुणशेठ ठाकूर यांच्यासह ठाकूर परिवारातील सदस्य व शिवाजीनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी भागुबाई ठाकूर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper