पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्र सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.१) पनवेलमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःची जनगणना करून या उपक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी पवन चांडक, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, तहसीलदार मीनल भोसले भामरे, उपसभापती भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वैशाली सावंत यांच्यासह इतर अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा स्वगणना स्वरूपात असून ही प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ, सोपी आणि सुरक्षित डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सर्व नागरिकांनीही स्वगणना करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली
पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …
RamPrahar – The Panvel Daily Paper