Breaking News

बोरघाटात खासगी बस उलटून दोघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : मुंबई-पुणे  द्रुतगती महामार्गावर खोपोली  हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी खासगी प्रवाशी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात दोन  प्रवाशी गंभीर तर अन्य 13 प्रवाशी किरकोळ जखमी झाले.चालक बाळाराम देवासी पाली (रा. राजस्थान) हा पुणे येथून ट्रॅव्हल्स बस (आरजे -22,पीए-4462) घेऊन सोमवारी राजस्थानकडे निघाला होता. बसमध्ये 15 प्रवासी होते. पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर खालापूर हद्दीतील आडोशी बोगद्यातून बस बाहेर पडताना चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्याकडेला पलटी झाली. या अपघातात सखाराम चौधरी (वय 35, रा. पुणे), पिंटू मूलाराम राठोड (वय 28, रा. पुणे) हे दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य 13 किरकोळ जखमी प्रवाशांना जागेवरच प्रथम उपचार देण्यात आले. अपघातानंतर महामार्ग वाहतूक पोलीस व खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरु केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply