रायगडात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह ; निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग : जिमाका

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून, त्यामुळे  ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी  नियमित योगासने करावीत,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 21) येथे केले.

संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेऊन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा पोलीस विभाग व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम येथील पोलीस परेड मैदानात आयोजित करण्यात आला होता. त्यात जिल्हाधिकारी सूर्यवंशी मार्गदर्शन करीत होते. यावेळी सुमारे एक तास चाललेल्या योग प्रात्याक्षिक कार्यक्रमात पतंजली योग समितीचे दिलीप गाटे यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिके दाखविली आणि त्याचा शारिरीक आणि मानसिक लाभ कसा होतो याचे मार्गदर्शन केले. त्यांना रवि पंडित, उषा बाबर, वैशाली पवार यांनी सहकार्य केले.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपविभागीय अधिकारी  शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी  अंकिता मयेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब थोरात, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त तपस्वी गोंधळी, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सुचिता साळवी यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी, अलिबाग येथील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी  आणि शिक्षक आदींनी या योगा प्रात्याक्षिकात सहभाग घेतला.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply