पनवेल : बातमीदार
महापालिका हद्दीतील धानसर गावात पावसाळी गटारे बांधण्याची मागणी राजेश तांबोळी यांनी पनवेल महापालिकेकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने धानसार गावातील गटारे बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे. पावसाळ्याचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने नागरिकांना यातून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे. धानसार गावातील जिल्हा परिषद शाळा ते स्मशानभूमीपर्यंत पावसाचे पाणी जाण्यासाठी गटार नसल्याने पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे गावात गटारे बांधण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.