Breaking News

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 10) रायगड जिल्हा परिषदेच्या विचुंबे येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत वह्यावाटप केले जाते. यंदाही हा उपक्रम राबविला जात आहे. विचुंबे येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर सुरते, सदस्य प्रमोद भिंगारकर, सदस्या अक्षता गायकवाड, नविता भोईर, संगीता भोईर, अनिता भगत, तृप्ती भोईर, नितीन भोईर, माजी सरपंच अमिता म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply