पनवेल ः रामप्रहर वृत्त
कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थेच्यावतीने पनवेलमीधल गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे सिडको अध्यक्ष यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थे मार्फत आद्योगीनी, लघुउद्योजक, व बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंनना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या साठी पनवेल मधील गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु राहणार आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, अंजली इनामदार, सुनीता खरे, उज्ज्वला पटवर्धन, समृद्धी जोग, गीता चौधरी, जयश्री पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रदर्शन व विक्री मेळाव्याला महापौर डॉ. कविता चौतमोल, आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी भेट दिली.