Breaking News

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे विविध शाळांमध्ये वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोरबे, रीटघरमधील शाळांमध्ये वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोर्बे, रीटघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि रिटघरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत वह्यावाटप करण्यात आले. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रिटघर सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच रमेश पाटील, राजेश फडके, विभागीय अध्यक्ष बाळाराम उसाटकर, वावंजा जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply