Breaking News

पोलादपुरात काँग्रेसला धक्का

पोलादपूर ः प्रतिनिधी

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवकपद भूषविणार्‍या लक्ष्मण जगताप गुरुजींचा सुशिक्षित मुलगा प्रशांत आणि नातू जयेश जगताप यांनी स्थानिक नेतृत्वाला कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, बिपीनदादा म्हामुणकर आणि संदीप ठोंबरे यांनी या दोघांचे भाजपत स्वागत केले.

प्रभाग क्रमांक नऊमधील स्वीकृत नगरसेवक ल. पां.जगताप यांच्या मुलाने आणि नातवाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भारतीय जनता पक्षाने खिंडार पाडल्याचे मानले जात आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply