Breaking News

म्हैस शेतात घुसली म्हणून केला हल्ला

रेवदंडा : प्रतिनिधी

म्हैस शेतात घुसल्याचा राग मनात धरून सागवाडी येथे दोघांवर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील सागवाडी येथील जयश्री फसाळ या दुसर्‍याच्या ठिकाणी काम करीत असताना महाजने येथील समीर पाटील यांनी तेथे जाऊन, तुमची म्हैस आमच्या शेतात घुसली होती, झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, अशी मागणी केली व तेथे बांधलेली म्हैस सोडून घेऊन जाऊ लागले. म्हैस नेण्यास विरोध केला असताना समीर पाटील यांनी जयश्री फसाळ यांना कोयत्याने कापून टाकीन अशी धमकी दिली व त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयता मारला. तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या कृष्णा पाटील यांनी साक्षीदाराचे डोके, हात, कंबर व पायावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या प्रकरणी जयश्री फसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात समीर पाटील व कृष्णा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply