Breaking News

देगावच्या शेकाप सरपंच भाजपमध्ये

माणगाव : प्रतिनिधी 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच भाजयुमो रायगड जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने यांच्या प्रयत्नाने मोर्बा विभागातील देगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शेकापच्या बबिता काटकर व त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी (दि. 6) पेण येथे झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत भाजपत प्रवेश केला. सरपंच बबिता काटकर, निळगुण अदिवासी वाडातील किसन काटकर, चंद्रकांत काटकर, प्रकाश वाघमारे, यमुना वाघमारे, परशुराम पवार, सुरेश पवार, अंकुश मुकणे, सीताराम मुकणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे, किसान मोर्चाचे सीताराम भोनकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply