Breaking News

पनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त

वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने नागरीकरण होणार्‍या पनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय ही आनंदाची बाब आहे. पनवेल शहर नावारूपाला येत असताना येथे राहणार्‍या प्रत्येकाने त्यात योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. ते गुरुवारी (दि. 22) पनवेल गौरव सोहळ्यात बोलत होते.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत ‘कर्तृत्वाला कौतुकाची थाप’ या शीर्षकाखाली लोकमत पनवेल गौरव पुरस्कार सोहळा गुरुवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. या सोहळ्यास ना. रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, आयुक्त गणेश देशमुख, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, सुलोचना कल्याणकर, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल, महिला मोर्चाच्या समिना साठी, श्वेता खैरे, लीना पाटील, बीना गोगरी आदी उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रांतील 26 व्यक्ती, संस्थांना पनवेल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply